लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

ढग दाटुन आल्यावर...
मला मातीचा गंध खुनावतो
"तुझी" आठवण येईल म्हणुन मी..
नेहमीच भिजायच टाळतो..
महेँद्र कांबळे.

भृण कन्येचा टाहो या राज्यस्तरीय प्रातीनीधिक कविता संग्रहासाठी लिहीलेली माझी कविता.


सांगत्ये ऐक आई...

मला बोलायचय काही...

जन्मूच नये एव्हढा,

काय अपराध माझा बाई..?

मोठी माणंसं तुम्ही
शहाणी अन् जाणती....
दिव्याइतकाच उजेड की गं
देतसे पणती....
ऊठ तुच आता कंबर कसून..
जन्म देणार मी मुलीला...
सांग सगळ्यांना ठासुन..
उभी राहिलीस तू तर....
पोटी तुझ्या जन्म घेईन...
जिजा,सावित्री अहिल्या
नी कल्पना होईन...!!!!
महेँद्र कांबळे.

अर्घ्यदान.....!


ही स्मशानशांतता संपून...
कधितरी पाखरांचा किलबिलाट कानावर येईलच...
नाकापुढचही न दिसणार्या गर्द काळोखास,
सुर्य शह देईलचं....
कधितरी थांबेलच
ही रातकिड्याची किरकिरी
अन् कोल्ह्यांची कोल्हेकुई...
बहरेल ना लवकरचं...
परसातली जाईजुई....
चला.........!
हे काळोखात चाचपडणं
आता थांबवायलाच हवं...
सुर्याला "अर्घ्यदान" देण्याच्या तयारीला....
आता लागायलाचं हवं...!
(अर्घ्यदान)
महेँद्र कांबळे.

पहाटच्या तिन वाजता...
हेलावून टाकणार्या हंबरड्याने दचकुन जागा झालो....
कळल की शेजारच्या बाईचा दिड वर्षाचा चिमुकला गेलाय न्युमोनीयानं....
तिचा वंशाचा दिवा विझलेला पाहून.....
आक्रंदत होती बिचारी....
तिन महिन्याअगोदर तिचा दारुबाज नवरा....
निघुन गेला होता घर सोडुन.....
भसाभसा सहा पोरी जन्माला घातल्या त्यानं...
रात्री अपरात्री ऊठुन पाणि प्यावं तसा दारु प्यायचा...
तसा चांगल कमवायचा पण दारुत गमवायचा...
एक मोठ्ठ घर अन् राहती जागा सगळं त्यानं दारुत स्वाहा: केलेलं....
आणि मग निघुन गेला.. नामर्दासारखा....
तिच्या एकटीच्या खांद्यावर संसाराचं "जू" ठेऊन..
एक महीना त्याचा शोध घेऊन ती मातीकाम करुन जगायला लागली..
नातीगोती सगळे तोँडापुरतेच बापडे...
पण ती डगमगली नव्हती तेव्हा...
एक दिवस मनं हलकं करायला घरी येऊन बसली..
शिळ्या भाकरी गाईला चारतात आयाबाया..
मागुन घेते म्हणते द्या मी चारते...
अन् दार लावून पोरींना घालते खायला..
घळघळ वाहत होते तिचे डोळे सांगतांना..
विषण्ण मनानं ऐकत होतो आम्ही...
पण हे दुःख कमी होत की काय म्हणुन तिचा मुलगाही हिरावून घेतला काळानं...
एव्हढ्या दुःखानं तर कुणीही वेडंच व्हावं....
पण ती अजुन शाबुत कशी?
लढायची तिची ऊर्मी अचंब्यात टाकायची मला..
वाटलं या आघातान नाहीच सावरणार बिचारी....
सगळ्या मुलींना उराशी कवटाळून टाहो फोडत होती...
आपटुन डोक्याला हिरवंगारं बेँड आलेलं...
तरवटलेले डोळे लालजर्द झालेले....
शेजारधर्म म्हणुन सांत्वनासाठी जमलेल्या आयाबाया...
शोकाकुल... खालमानेनं तिला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करणार्या...
तिन की चार दिवसानंतर....
भल्या पहाटेचं ऊठलेलो असतांना...
पदर खोचुनं, पाटी घेउन मला ती कामावर जातांना दिसली....
ति "हिरकणी" जात होती माझ्यासमोरुन.. जगण्याची आपली आयूधं पाजळंवतं... आणि मला दिसतं होतं क्षितिजापल्याडं लालेलाल सुर्यबिँब डोँगराच्या वर येतांना.....!
महेँद्र कांबळे.

कातरवेळ....!

कातरवेळ....!
दिसं ढळला ढळला...
झाली सांजची ही वेळ...
सुरु मनाचिया होई
अस्वस्थ धावपळ...
पळ कटता कटेना
डोळा वाहे खळखळ...
मन झालं सैरावैरा
कशी कातर ही वेळ...!
माझं मन जणू मृग
नितं धावं तिच्या मागं...
काय धावून फायदा...?
तिचं रुप मृगजळं....!
पळ कटता कटेना...
कशी कातर ही वेळ...!
जरी असेल या क्षणी
मजपासुन "ती" दुर...
मात्र मनाने वाटते
नित काळजाजवळ
तिच्या आठवात आहे...
एक आनंद निखळ....!
मन झाल सैरावैरा...
कशी कातरं ही वेळ.....
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected