लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

डायरीचं पानं...

हो मला दुःख होतं. वेदना होतात.
कुणी अपमान केला तर
कानशीलही तापतात. कौतुक
वाट्याला आल्यावर मी हुरळून जातो.
आनंद झाल्यावर हसतो अन् रडतो देखील.
उदासीनता, अस्वस्थता, नैराश्य ते तर
येतचं. किंबहुना ते यावचं.
एखादा सुंदर चेहरा समोरुन जाताच
बघण्याचा मोह होतो. फुलांचा गंध,
पहिल्या सरिचा मृद्गंध मला बेभान करतो.
ह्या गोष्टींमुळे मला जिवंत
असल्याचा भरवसा येतो.
साधा माणुस आहे मी षडरिपूनी युक्त असा.
कुणी योगी नाही स्थितप्रज्ञ तर मुळीच
नाही....
पण एखाद्या फुलाचा उरभर सुगंध घेतांना ते
चुरगाळू नये याच भानं मी कायम ठेवतोचं.
महेंद्र कांबळे. .

डायरीचं पान 4

दरवेळेस आयुष्याचा नवा डाव मांडण
खरोखरच कठीण असत. परत
नव्या सोंगट्या घेऊन पट मांडायला आयुष्य
म्हणजे बुध्दीबळाचा खेळ नव्हे.
काही काही नाती खरोखरच गुढ. एखाद
माणुस आयुष्यात येणं अन् फेर धरुन आयुष्यच
त्याभोवती नाचु लागनं सगळचं
अनाकलनिय.
ठसठसणार्या जखमा घेऊन
नव्या नात्याची सुरवात कशी करावी?
जुन्या नात्याचं अपयश भिववतं.
तू आयुष्यात येण्याअगोदर खरतर जगणं
म्हणजे आवसेची किर्र रात्रचं होऊन गेलेलं.
तशात तुझं चांदणं आयुष्यात पडलं अन्
जिवनाच्या दिशा उजळुन गेल्या...
त्यातही मी असा, कायम
फाटका खिसा त्याहुन फाटकं तोंड.....
पाऊलो कोएलोनं ब्रिडात
प्राणसखिचा कन्सेप्ट
सांगितला तसा मला काय
पहील्यांदा पाहताच
तुझ्या डाव्या खांद्यावर प्रकाशबिंदु
दिसला नाही. पण डोळे भिडल्यावर एक
विशीष्ट चमक डोळ्यात जाणवली तुझ्या...
आता त्या गोष्टींचा उगाच अर्थ लावत
बसतोय एकट्यात.
खरतर आजवरची वाटचाल निर्धेयचं. रखरख
वाळवंटाचाच रस्ता पाचविला पुजलेला...
अश्यात पहिलं मरुद्यान लागल कवितेचं
नी गाण्याचं, नंतर मित्रांच नी तुझं...
माझं एक बरयं लिहुन चार
मित्रांना निदान सांगु तरी शकतो..
तुला मात्र आसवं गाळण्यावाचुन पर्याय
नाही. एकुण सारखचं, मला लिहून हलकं
वाटतं अन् तुला रडुन.
संदिप खरेंनी काय सुंदर लिहलय ना..
झरते तिकडे पाणि टपटप
अन् ईकडे ही शाई झरझर..
कितीक हळवे कितीक सुंदर...
किती शहाणे आपुले अंतर.
महेंद्र कांबळे.

डायरीचं पानं..

ध्यानाचा आनंद अद्भुत असतो. स्वतःत डोळे मिटुन हरवुन जाण्यात केव्हढं सौख्य.
अंधार गुडूप मनाची नदी अन् मनाच्याच डोँगीत विहरणारे आपण....
मनाला निर्वीचारी करणं हा परमोच्च बिंदु पण तस करतांना आता कुठलाचं विचार करायचा नाही हा विचार डोकावतोचं.. भारीच मज्जा....!
कित्येकदा ठरवुनही ध्यानाला बसणं नाही होत पण बसल की इतके दिवस काहीतरी मिस केल्याची चुटपुट लागतेचं..
... काकांसोबत पहाटच्या पाचाला फिरायला गेलो, तेव्हढ्या सकाळी चहाची एक टपरी उघडलेली..
काय सुंदर सकाळ आहे ना काका? मी बोलुन गेलो...
सकाळ रोजचं होते अन् ती नेहमी सुंदरच असते..
अर्धशिक्षित चहावाल्यानं किती सहजपणे एक सखोल गोष्ट सांगीतली..!
एखादी वेळचं विचित्र असते. जेव्हा शरीरातून रक्ताऐवजी नुसती नकारत्मकताच वाहत असल्याच जाणवतं. सामसुम मध्यरात्रीही मनात केव्हढा गजबजाट अन् कल्लोळ...
शी... थकलो यार दरवेळी स्वतःला प्रुव्ह करता करता... जगणं कधी होणार आनंदयात्रा त्यासाठी प्रयत्न करुन चुक केली की काय? मळलेल्या वाटा सोडुन केलेल्या मुक्त मुशाफिरीने पश्चातापाची वेळ तर नाही ना ओढवणारं? काही का असेना भल्याबुर्याची जबाबदारी तर शेवटी आपलीचं... पण ही पहाट होत का नाही...?

शिवबा....!

झालेत मावळे हे
सैरवैर शिवबा....
नाही कुणाची आता
इथे खैर शिवबा....
कसे जोखडांनी हे
खांदे झिजुन गेले...
कुणिही वाहवेना
कसा भार शिवबा....?
विस्कटुन गेलीय
घडी कशी इथली...
कशी ही बसवावी
घडी फेर शिवबा...?
बोलुन गोड येथे
सर्रास घात होतो...
मागु कुणास आता
मी आधार शिवबा...?
ओठात राम आहे...
ओठात भिम आहे...
बगलेत का मग
तलवार शिवबा....?
(अर्घ्यदान)
महेंद्र कांबळे

चिडखोरं....!

 मी चिडतो खुप चिडतो..
अगदी चिड चिड चिडतो
सकाळी लवकर जाग नाही आली
म्हणुन चिडतो...
नळाला आज पाणि नाही
... म्हणुन चिडतो...
दुधवाला उशीरा आला
म्हणुन चिडतो..
लोडशेडीँग मध्ये डोक्याला ताप म्हणुन चिडतो....
कुठलही कारण चालत माझ्या चिडण्याला
तुरडाळीचे भाव गेलेत गगनाला...
भाजीपाला प्रचंड महागला..
बाजारात आहे गॅस अन् राँकेलचा तुटवडा..
टपरीवाल्यान दिला नाही गरमागरम बटाटावडा...
सर्रास सिग्नल तोडणारे
खुलेआम चिरीमिरी घेणारे..
निवडुन येताच जनतेच्या डोक्यावर
थयथय नाचणारे
साधा सातबारा देतांना
टेबलाखालून हात समोर करणारे..
हे सगळं मी हताश डोळ्यांनी बघतो
अन् मला हे बदलता येत नाही म्हणुन चिडतो
खुप चिडतो... चिड चिड चिडतो...
एव्हाना मला तुम्ही ओळखलं असेलचं...
भ्रष्टाचाराच्या,
जातिव्यवस्थेच्या वाळवीनं पोखरलेल्या
जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशात
माझं अस्तीत्व प्रत्येक जागी तुम्हाला जाणवेलं
प्रत्येक ठिकाणी मी तुम्हाला दिसेल...
मुलाच्या अँडमिशनच्या रांगेत..
गॅसच्या रांगेत..
ट्रेन,बसच्या टिकीटांच्या रांगेत..
किराणा दुकानाच्या रांगेत...
सरकारी रूग्णालयांच्या रांगेत....
मी असतो कायम रांगेत....!
आजवर खुप लिहील्या गेलंय माझ्यावर..
एक पुतळसुध्दा उभारलाय माझा
चित्रपटातुनही होतात माझे लिलावं कधीकधी...!
मी आहे तुमच्यातलाच एक सामान्य माणुस..!
जो चिडतो पण हारत नाही..
कुठल्याही संकटाला कधीच डरत नाही...
सामान्य जरी असलो तरी माझ असामान्यत्व जगमान्य आहे..
कारण.....
मी चिडतो खुप चिडतो
अगदी चिड चिड चिडतो
पण आयुष्याची लढाई रोज नव्याने लढतो....!
(अर्घ्यदानं)
महेंद्र कांबळे.

आताशा .........

आताशा येत नाही
तुझ्या आठवणीने डोळ्यात पाणी..
अन् नकोशीही वाटत नाही
शांत सांज दिवाणी..
आताशा येत नाही एक कोवळ हळवपण...
अन् मनात दाटत नाहीत
तुझ्या आठवणीचे गर्द घन.
आताशा काळजातल दुःख
डोळ्यात येत नाही..
कारण मला कळून चुकलयं.
कुणावाचूनच कुणाचं,
इथ जगणं थांबत नाही.
(अर्घ्यदान).

एक इवलिशी प्रेमकथा...!


काँलेजचे धुंद दिवस...
अन् त्यांच वेड वय...
तिला न्याहाळण्याची एकटक...
त्याची खुळी सवय..
... सुरवातीला त्याच्याकडे ती रागानं बघायची
तो दिसताच ओठातचं
काहीतरी पुटपुटायची.
तरी तो तिच्यासाठी वेडापिसा व्हायचा....
ती दिसताच त्याच्या मनमयुराचा
जणु पिसारा फुलायचा.
हळूहळू तिच्या मनातला
राग मावळू लागला...
त्याच्या मनातला प्रितपाझरं..
तिलाही कळू लागला.
आता करत होत्या दोघांच्याही नजरा
एकमेकांशी गुजगोष्टी....
हिरवी धरती, निळं आभाळ..
प्रितमय झालेली सारी सृष्टी.
भावनांची अजब कोँडी
आसवांची सांडासांडी...
तिच्यावरुन त्याच्या मित्रांशी
झालेली त्याची भांडाभांडी...!
काळजातले शब्द त्याच्या
ओठावरती यायचे
ति समोर येताच मात्र...
हवेतचं ते विरायचे..
शेवटी ते काम
एका गुलाबाने केलं...
तिनंही होतं त्याला
कधीचचं मनं दिलं.
आता वाढल्या होत्या त्यांच्या
लपुनछपुन भेटीगाठी
ठरलं होत आधार द्यायचा..
एकमेकांना जन्मभरासाठी.
मधुरं कोकीळेची तानं
अन् आंब्याला आलेला मोहरं...
पहिल्या वहिल्या प्रेमाचा..
अगदी पहिलाचं बहरं..
पण......
पण शेवटी निघाली
निष्ठुर नियती....
तिला आलं स्थळं छानं...
अन् त्याची खुंटली मती.
मध्यमवर्गीय घराचा उंबरा
ती ओलांडू शकली नाही...
तिच्या विरहात त्याच्या अंगाची
होत होती लाहीलाही...!
जपरे स्वतःला,
वसव स्वतःचं घर.
दिपतील जगाचे डोळे..
असं काहितरी कर..!
विसरुन जा मला
अन् मार उंच भरारी..
त्याच्या मनाला दिलेली
तिने शेवटची उभारी...
सोसल्या त्यान असह्य कळा
तिच्या सुखातला तो
नाही झाला अडथळा..
शेवटी ती चढली बोहल्यावर...
निनादत होते तिच्या भोवती सनईचे सुर...
त्याच्या वाट्याला मात्र बाटली अन् कोंदट सिगरेटचा धुरं.....
शेवटी बर्याच दिवसानंतर तो सावरला.
तिला दिलेल्या वचनाला जागला....
आता त्याच्याकडे नव्हती कमतरता
पैसा अन् प्रतिष्ठेची...
पण त्याला सोबत होती
केवळ तिच्या आठवणींची.....
दिसं मास ऋतु उलटले
उलटुन गेली दशके चार....
नियतीने पुन्हा फिरवलं
आपल चक्र एकवार...
त्याच्या वृध्दाश्रमात एकदा
ती त्याला भेटली
जाड भिंगाच्या चष्म्यातुन त्याला
जन्मोजन्मिची ओळख पटली...
तिच्या भाळी नसलेलं 'कुंकू' पाहुन....
क्षणभर तो बधीरचं झाला...
इतक्यात त्याच्या कानावर
तोच ओळखीचा आवाज आला....
दाताच बोळकं सावरत ती म्हणाली..
देशील ना रे मला आधारं.....
अन् क्षणात त्यान मोडीत काढले
समाजाचे शिष्टाचार...!
काठी सावरतं तिचा खरखरीत हात...
त्यान स्वताःच्या हाती घेतला....
शेवटी तिच्याचसाठी तो
होता आजन्म अविवाहित राहिला..
वृध्दावस्थेत एकमेकांची
त्यांनी सोबत केली...
तिची त्याची इवलीशी प्रेमकथा अशी पुर्णत्वास गेली.....!!!
(अर्घ्यदानं)
महेँद्र कांबळे.
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected