लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गझल.2

काही नवे शेर आणि काही चुकांची दुरुस्ती करुन परत पोस्ट करतोयं.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.
कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.
मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.
तुझ्या त्या तिळाची किती गं मुजोरी
तुझ्या काजळाने किती गं छळावे.
नवा सूर आहे नवा ताल आहे
नवा कंठ आता नवे गीत गावे.
करा पिंज-याची कवाडे निकामी
नभी पाखरांच्या उडावेत रावे.
नको घेउ हाती जगाचा तराजू
तुझ्या काळजीने मला पारखावे.
असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.
किती तू गहीरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?
अकस्मात जेंव्हा समोरून आली
कळेना मनाला कसे आवरावे.
नवा आरसा की नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.
नशीबात आहे अशी ही फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.

गझल.

तुझे गोड कावे तुझे फोल दावे
अता जाणले मी तुझे बारकावे.

कशाला जगाची तमा बाळगावी
कशाला जगाशी अता मी लढावे.

मला साथ आहे इथे वादळांची
खुळ्या संकटांनी जरा दूर व्हावे.

उन्मळून गेलो तिने दूर जाता
तिच्या आठवांनी कशालाच यावे.?

नको घेउ हाती जगाचा तराजू
जरा काळजीने मला तू बघावे.

असा संपलो मी असे वाटतांना
तुझ्या वेदनांनी फुलारून यावे.

किती तू गहिरा दिला घाव होता
किती सावरावे कसे सावरावे.?

(अकस्मात जेंव्हा समोरून आली)
कळेना मला मी कसे आवरावे.

नवा आरसा कि नवा चेहरा हा
नव्याने कसे मी हसूनी जगावे.

नशिबात आहे अशी हि फकीरी
सुखाचे मला तू अता दान दयावे.
महेंद्र गौतम.

घाव.

मोहरल्या आनंदाचे
मनडोही तरंग बाई
या अश्या अनामिक वेळा
हि कशी अनामिक घाई?
एक श्वास कसा थरथरला
निशब्द पापणी ओली
मी उगच मोजाया बघतो
गूढ आभाळाची खोली
ओठास कसा मी आवरू?
स्तन तिचे रक्ताळून गेले
ती पान्हा आटली डोंबारीन
अन मुल तिचे रडवेले.
महेंद्र गौतम.

मी.

जगाने टाळलेला मी
तमाने जाळलेला मी.
वसंता दूर तू जा रे
मुळाशी वाळलेला मी.
कुणाची वाट ती पाही
तिनेही गाळलेला मी .
जरासा पापणी चाळा
कसा ओशाळलेला मी.
सईची याद येतांना
उभा गंधाळलेला मी.
कुणाला शोधतो आहे
कुणी धुंडाळलेला मी.
तिथे तू घाव भर त्याचा
इथे रक्ताळलेला मी.
जळूनी खाक झालेला
तरी तेजाळलेला मी.
महेंद्र गौतम.

मी.


जगाने टाळलेला मी
तमाने जाळलेला मी.

कशाचा चांदवा आता
रूपाने पोळलेला मी.

वसंता दूर तू जा रे
मुळाशी वाळलेला मी.

कुणाची वाट ती पाही
तिनेही गाळलेला मी.

सईची याद ती येता
उभा गंधाळलेला मी.

कुणाला शोधतो आहे
कुणी धुंडाळलेला मी.

धावण्या वेग तो येता
जरा रेंगाळलेला मी.

जळूनी खाक झालो रे
अता तेजाळेला मी.
महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected