लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

कथा :- भूमिका


नेहमीपेक्षा आज तिला जरा उशिरच झाला होता. रिक्षान लगबगीन ती स्टेशनकडे
निघाली होती.
'भैया जल्दी चलो ८.१० कि लोकल पकडनी है!' घडीकडे पाहत ती रिक्षावाल्याला
सांगत होती.
मुंबापुरीच्या असंख्य चाकरमान्यासारखीच तिही एक.कुठल्याश्या प्रायव्हेट
फर्ममध्ये घर सांभाळून काम करणारी. लोकलच्या प्रचंड गर्दीत रोज प्रवास करणारी,
कामावरून थकून भागून आल्यावरही नवरोबाला गरम गरम वाढणारी.
खरतर ह्या घाईगार्दीच्या आयुष्याशी तीनं चांगलीच हातमिळवणी केली
होती.परिस्थितीशी जुळवून घेण्यात इतर मुंबईकरांसारखीच तीही पटाईत झाली होती.
लगबगीन ती स्टेशनमध्ये घुसली. लोकलने किंचित वेग घेतला होता. अगदी
डोळ्यासमोरून दिसणारी लोकल पकडण्यासाठी ती धावली.!! त्याच नादात पायाखाली
केळीची साल येउन तिचा कपाळमोक्ष होणार इतक्यात मागून तिला कुणीतरी सावरल.
'हट गेली लोकल!!' ती चिडून उद्गारली
तिला सावरणाऱ्याला धन्यवाद म्हणायचं भान तिला आल. ती वळली आणि एकदम चमकलीच..
मगची आकृती तिच्याकडे बघत मंद हसत होती.
"अविनाश तू..!!!!" आश्चर्याने ती जवळ जवळ ओरडलीच.
हो मिच... ती कमालीची गोंधळली
>> "तू इथे असा अचानक कसा .....????" तिला काय बोलाव तेच कळेना..
>> "सांगतो. सगळ सांगतो. चल कुठेतरी चहा घेऊ. तीन वर्षानंतर भेतेयेस, असच
>> तोंडदेखल बोलून बोळवण करणार का..??"
>> त्याच्या ह्या बोलण्याने ती परत गोंधळली. क्षणात तिला तिच्या जॉबचा विचार
>> आला. आधीच उशीर झालेला पण त्याच्याशी बोलनही खूप महत्वाचं होतं..
>> "एवढा काय विचार करतेस? अरे हो तुला कामावर जायच असेल..ठीक आहे पुढची गाडी
>> येइलच मग जा तू. तसाही मी आज रात्री जाणारच आहे म्हटलं दिवसभरात जरा जीवाची
>> मुंबई करावी.".
>> आपला भूतकाळ पुढ्यात आलेला पाहून ती तशीच फार चक्रावून गेली होती. तिच्या
>> मनात संमिश्र भावनांची गर्दी झाली होती आणि तसही खूप दिवसानंतर मन मोकळ
>> करायला कुणीतरी आपल माणूस भेटलं होत. हि संधी तिला घालवायची नव्हती. तसा तिचा
>> संसार फार नेटका होता, पण संवाद क्वचितच. लोकलचा प्रवास करून आंबलेल्या
>> शरीराने घरी येउन झाडझूड स्वयंपाक आणि इतर कामात रात्र कधी व्हायची तिला
>> कळायचच नाही. आणि सकाळी पाचला उठून स्वतःचा आणि नवर्याचा डब्बा करण्यात सकाळ
>> सरून जायची. तिचा नवरा आणि ती अशी दोघच राहायची, तो कायम उशिराच यायचा.
>> मनमोकळ्या गप्पा, दिलखुलास हसण, अश्या गोष्टी कुठेतरी बाजुला पडल्या होत्या.
>> सगळ कस यांत्रिक. तिचा नवरा रजत मुंबईत स्वतःच घर घेण्यासाठी राबत होता.
>> ऑफिसमधल्या फाईल्स घरी आणून तो काम करायचा. सतत कामाच्या
>> तंद्रीत.बँकबँलन्सच्या नादात त्यान स्वतःलाच वेठीस धरल होतं. या गोष्टीची तिला
>> विलक्षण चीड यायची. सुरवातीला तिने त्याला हे सांगितलं देखील. पण पैसा
>> जोडण्याचा आणि राबण्याचा हाच काळ आहे वय झाल्यावर कष्ट होणार नाहीत अस साचेबंद
>> उत्तर तिला मिळायचं.
>> "जाणार आहेस का मग? बघ लोकल येतेय.."
>> "एक मिनिट, चल बाहेर जाऊयात. इथे फार गोंगाट आहे रे." ती कसलासा विचार करत
>> बोलली.
>> एका छानश्या हॉटेलात बसून त्यांनी चहाची ऑर्डर दिली.तिने फोन करून कुणालातरी
>> काहीतरी सांगितलं.
>> "मग मुंबईत कसा?" वाफाळलेला चहा घेत तिची सुरुवात.
>> "अरे सांगायचच राहील, बहुतेक पाहिलं पुस्तक येईल माझ आकाराला एका
>> प्रकाशकाने बोलवलं होत."
>> व्वा ! लिहितोस म्हणायचं अजूनही? अभिनंदन!
>> "ते जाऊ दे ग. मला सांग तू कशी आहेस? संसार काय म्हणतो तुझा?"
>> "बर आहे सगळ." उगाच उसन अवसान आणल्यासारख झाल तिला.
>> "तू मात्र आहे तसाच आहेस. काहीच बदलला नाहीस."
>> "पण तू मात्र बदललीस. किती सुकलीस. फार दगदग होत असेल नाही.?"
>> ह्यावर फक्त ती खिन्नशी हसली. तिला एकदम सगळे आठवले तशी ती घाईत म्हणाली..
>> "सगळे कसे आहेत रे. आपला पूर्ण ग्रुप.? काय करतात कोणकोण? किती जणांची लग्न
>> झालीत ?"
>> "मुलींचं माहित नाही पण वश्या आणि सुध्या लग्न करून मोकळे झालेत दोघेही एका
>> बँकेत लागलेत पैसे भरून.."
>> "आणि आपण काय करता? लिखाणच करता कि अजून कुठे नोकरी वगैरे?"
>> " हो प्राध्यापक आहे एका कॉलेजात. शिवाय phd. करतोय. तुमच्या b.com.
>> वाल्यासारख थोडीच आम्हाला डिग्री झाल्या झाल्या जॉब मिळतो.
>> स्ट्रगल आहे कला शाखेत फार. पण लिहिता वाचता येत."
>> "आणि लग्न वगैरे?"
>> ह्या प्रश्नासरशी त्याच्या चेहऱ्यावरचा रंगच बदलला..
>> "नाही अजून ! ते जाऊ दे काय दाखवशील तुझ्या मुंबईतल.? बघण्यासारख भरपूर आहे
>> म्हणे इथे? मला तर समुद्रच बघायचाय."
>> "चालेल. जाऊयात चल."
>> "एवढ्या चिक्कार गर्दीत कस adjust करता रे तुम्ही..??" स्टेशन वरची गर्दी
>> त्याला असह्य झाली होती.
>> "होते रे सवय हळूहळू."
>> "सवय होते कि करून घेता?"
>> 'तसच काहीसं..."
>> इतक्यात लोकल आली. सरावान ती आत घुसली. मागोमाग तोही चढला. बाहेरची
>> स्टेशन्स, चढणारी, उतरणारी माणस , सगळ वातावरण त्याला नवखच होत.
>> पण त्याच्या शांत हसर्या चेहऱ्याकडे बघत तिच्या मनात मात्र विचारांचं वादळ
>> उठत होत. किती मोरपंखी दिवस होते ते. एकमेकांच्या प्रेमात तुडूंब डूबण्याचे !!
>> फुलपाखरू होऊन बागडण्याचे. अविनाश तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा. तिचही होतच
>> त्याच्यावर प्रेम. प्रेमाचा कैफच वेगळा. त्या धुंदीतच भरभर तीन वर्ष सरून
>> गेली.डिग्री संपली.त्याच वर्षी रजत तिला बघायला आला. घरच्यांना थोडी कुणकुण
>> होतीच,एखादा वेडसर निर्णय घेऊन पोरगी आयुष्य उध्वस्त करून घेईल ह्या भीतीपोटी
>> घरच्यांनी तिची गाठ रजतशी बांधून दिली. बिचारीचा विरोध वळीवाचा पाऊस ठरला.
>> मुकाट बाशिंग बांधून तिला रजतच्या घरी जावच लागल.अविनाशला विसरण आणि रजतला
>> स्विकारण दोन्ही गोष्टी सोप्या नव्हत्या. गेली तीन वर्ष ती घुसमटत पण टुकीन
>> संसार करत होती. एव्हाना cst आल. दोघंही उतरून समुद्राकडे चालू लागली. हळूहळू
>> समुद्राच्या लाटांचा आवाज कानावर येऊ लागला.
>> "तू अजूनही तेव्हादाच भटकतोस.?"
>> "मग काय छान वाटत मला तेच. पण तू ऑफिसला दांडी मारलीस ना ते बघून मला जुने
>> दिवसच आठवलेत एकदम. कॉलेज बुडवून कसे भटकायला जायचो ना आपण.?"
>> मग बराच वेळ ते दोघ वाळूतून चालत राहिले. भेल पाणीपुरी बर्फ का गोला.. किती
>> दिवसानंतर ती एवढ खळाळून हसत होती, ती कोण आहे हे काहीवेळ तरी ती विसरलीच.
>> बराच वेळ ते इकडे तिकडे भटकत राहिले. आणि संध्याकाळी परत किनार्यावर आले.
>> किनाऱ्यावरच्या लाटांकडे पाहत दोघांचीही तंद्री लागली.
>> "खर सांग तू लग्न का नाही केलस अजून.? तिने त्याच्याकडे बघितलं. तसा तो
>> भानावर आला.
>> "असच नाही केल. म्हणजे करावस वाटल नाही आतापर्यंत म्हणून."
>> "करावस वाटल नाही कि मी तुला सोडून गेले म्हणून.?"
>> "काहीतरीच नको बोलूस.. तस नाही काही."
>> "कदाचित असेलही; पण खर सांग ब्लडप्रेशर असणाऱ्या वडिलांना दुखवण माझ्याकडून
>> कस शक्य होत रे..? त्याचं काही बर वाईट झाल असत तर? अवघड होत सगळच. किती
>> दिवसापासून हा सल मनात घेऊन जगतेय. कस जगतेय ते माझ मलाच ठाऊक. पण अपराध केलाय
>> तुझा मी. जमल्यास माफ करशील मला." तिचे डोळे सजल झाले.
>> "खर सांगायचं तर माझी होरपळ तुला सांगूही शकत नाही. एखाद्या अनोळखी माणसाला
>> सर्वस्व अर्पण करण्यात किती जीव गुदमरतो ते कळायला बाईचाच जन्म लागतो..
>> त्याच्या मिठीत असताना मला तुझ्या मिठीत असल्याचा भास व्हायचा. किती सुंदर
>> इमले बांधले होते मी उद्याचे. तुझ्यासोबतच्या सहजीवनाचे. पण......
>> घरच्यांशी मनमोकळ बोलावही नाही वाटत तेंव्हापासून. प्रचंड तिटकारा येतो.
>> घरातही रजतचा शब्द अन त्याचीच मर्जी.. एका सुशिक्षित मुलीला स्वतःचा
>> आयुष्यभराचा सोबती निवडण्याचाहि अधिकार नसावा..?"
>> तिला त्याच्या कुशीत शिरून हमसावस वाटल. त्यान प्रेमान तिच्या हातावर हात
>> ठेवला.त्याच्या डोळ्यात प्रचंड कारुण्य दाटल होत.
>> "हे खरय कि तूझा खूप राग आला होता मला. तिरस्कारही वाटायचा तुझा. आणि तो
>> साहजिकही होता. अगतिकता येतेच कि त्यावेळी. पण काळ जाऊ द्यावा लागतो थोडा.
>> मला वाटल कि मी संपलो पण खर सांगतो मोठ चिवट असत आयुष्य. मोठ्या मोठ्या जखम
>> भरतात सहजच. दुःखाच,वियोगाच,वेदनेच विस्मरण स्वाभाविकपणे होतच. तुझी आठवण आली
>> कि चडफडायचो. पण शांत डोक्यान विचार केल्यावर उमगल एक दिवस,
>> भूमिका महत्वाची. प्रत्येकजण आजन्म त्याच्या भूमिकेला न्याय देण्याचा
>> प्रयत्न करतो. वेगवेगळ्या जागी वेगवेगळी भूमिका.त्या भूमिकेशी प्रतारणा
>> कुणालाही करता येत नाही. तुझ्या वडिलांच्या भूमिकेत मी असतो तर माझाही तोच
>> निर्णय असता. त्याचं सगळच योग्य होत. एक बाप आपल्या मुलीचा हात एखाद्या
>> बेरोजगार माणसाच्या हातात देइलच कसा.? लायकी, कर्तुत्व ह्या गोष्टी बापासाठी
>> महत्वाच्या असतात..प्रेमात आणि संसारात भयंकर तफावत आहे. तुझ्यावर काहीच रोष
>> नाही माझा. माझ्यापेक्षा कितीतरी जास्त तुला भोगाव लागल याची जाण आहे मला. तू
>> गेलीस आणि पुस्तकावरच प्रेम करायला लागलो. M.A. केल B.ed करून कॉलेज मध्ये
>> लागलो. आपण कधीतरी सर्वस्व विसरून प्रेम केल होत हि भावनाच खूप सुखावून जाते
>> कधी कधी.
>> तू रजतमध्ये कधीच मला शोधत जाऊ नकोस कारण प्रियकर आणि नवरा यांची कधीच तुलना
>> होत नाही. नवर्याच्या भूमिकेत जबाबदार्या असतात. प्रियकराला फक्त प्रेम करायचं
>> असत.. रजत त्याच्या भूमिकेला साजेसाच वागतोय.. तुझ्यासाठी तुमच्या सुखावह
>> उद्यासाठी तो कष्ट उपसतोय तुला त्याला साथ द्यावीच लागेल. बायको,मुलगी, सून,
>> या सगळ्या भूमिका तुलाही पार पाडायच्यात.. तुला पाडगावकरांची ती कविता आठवते
>> का?
>> "पेला अर्धा सरला आहे
>> अस सुद्धा म्हणता येत
>> पेला अर्धा भरला आहे
>> अस सुद्धा म्हणता येत
>> सरला आहे म्हणायचं कि भरला आहे म्हणायचं
>> तुम्हीच ठरवा
>> सांगा कस जगायचं कण्हत कण्हत
>> कि गाण म्हणत तुम्हीच ठरवा.."
>> म्हणून म्हणतो अस मुळूमुळू नको रडत बसू. जे आहे ते स्वीकार शेवटी वास्तव हे
>> वास्तवच असत.आणि भूतकाळाच्या आठवणीत कुढत जगण्यापेक्षा वर्तमानाचा विचार कर.
>> तो जास्तीत जास्त आनंदी करायचा विचार कर.
>> "बर गातेस कि नाही कधी ?"
>> त्याच्या या प्रश्नावर मात्र ती खुदकन हसली..
>> "हल्ली तर बाथरूममधेसुध गात नाही रे. मोठ्या हौसेन तंबोरा आणला होता. धूळ
>> खात पडलाय कधीचा"
>> "मग त्यावरची धूळ झटक आणि तुझ्या मनावरचीदेखील.. चल निघुयात.. " तो
>> जाग्यावरून उठत म्हणाला. आणि ती दोघं परत स्टेशन कडे चालू लागली.
>> तिच्या गाडीला थोडा वेळ होता. गाडीची वाट पाहत ती दोघे उभी होती.
>> "एक बोलू का ? तू आलीस एक दिवस सोबत घालवलास खूप बर वाटल. माझ्या लग्नाची
>> पत्रिका तुला लवकरच पाठवीन. "
>> तीन हलकेच त्याचा हात हातात घेतला इतक्यात गाडी आली.. आणि ती डब्ब्यात
>> चढली. त्याने तिला निरोप दिला..
>> आता तिला त्या
>> डब्ब्यातल्या बायकांच्या आवाजाचा त्रास होत नव्हता. गर्दी विसरून ती स्वतःत
>> गुंगून गेली खूप दिवस ठसठसनारा फोड फुटून त्यातून सगळी घाण निघून जाउन
>> प्रचंड सुखावह वाटावं तस तिला वाटू लागल. बर्याचशा गोष्टी तिने ठरवून टाकल्या.
>> घरी जाताना छानसा गजर घ्यायचा, रजतच्या आवडीचे मसाला वांगे करायचे, वडिलांना
>> फोन करून त्यांच्या तब्बेतीची चौकशी करायची.. आणि तंबोरा साफसूफ करून परत
>> गायला बसायचं होत.
>> पळणारे झाड आणि माणस बघत ती स्टेशनची वाट बघत स्वस्थ बसली..
>> महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected