लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

बिढारं:- एक अस्सल नेमाडपंथी अनुभवं..

एखाद्या आवडत्या गावाला जायचं असल्यावर लहान मुल किती हरखुन जातं. त्यात मग ट्रेनची विन्डो मिळाल्यावर क्या बातं!!. मग ट्रेन शिट्टी देते, हळूहळू वेग घेतो. मग झाडं ,माणसं पळतांना बघणं. चॅय्यवाला भेळं... किती रंगून जातं ते मुलं. माझंही अगदी तसचं झालं निमीत्त भालचंद्र नेमाडेंच 'बिढार'..
मी नेमाडेंच्या लिखाणाचा ,शैलीचा आणि त्यांच्या मिशांचाही जबरदस्त फॅन आहे. ऑल टाईम ग्रेट कोसला आणि बहुचर्चीत हिन्दू यांचा हँगओव्हर अद्याप उतरलाच नाही. त्यामुळे बिढार सुरु केलं तेचं रोमांचीत अवस्थेतं आणि मग हळूहळू वेग घेतं अपरिहार्य रंगून जाणं..
कादंबरीची सुरुवात चांगदेवं या कादंबरीच्या नायकाच्या दुर्धर आजारपणापासून होते पण त्याला काय झालं हे कळायलाचं 86व पानं यावं लागतं तोपर्यंत उत्कंठा ताणुन राहते.
कादंबरी एकदम सळसळती आहे, चांगदेव आणि त्याचे भयंकर क्रिएटीव्ह मित्रं. जग बदलु पाहणारं अमाप ऊर्जेचं तारुण्यं.. आजारपणामुळे निराश होऊन भयंकर वैराग्य येऊन स्वतः स्वतःलाच अंताकडं नेणारा आणि अकस्मात त्या आजारातून आश्चर्यकारकरित्या वाचल्यावरं पुढचं आयुष्य सकारत्मकतेनं जगायचं ठरवणारा चांगदेवं वाचकाला बांधुन ठेवतो. आजारपणातलं त्याच भावविश्व अप्रतिमं रेखाटलय पणं यात सौँर्द्यपुर्ण पध्दतीन काही सामाजीकं प्रश्नही हाताळलेतं जसं 'प्रकाशकाची ऐतखाऊ संस्था'.. दुसरीकडं लिहिणारे बेसुमार वाढलेतं ज्याला त्याला प्रसिध्दिची घाई झालीय मग पैसे घेउन छापणारं नाहित काय? हा सवालंही येतो.
पण जादु आहे नेमाडेंची शैली म्हणजे, कोसलात जसं उदाहरणार्थ, थोर, हे मात्र फारचं झाले असे शब्द येतातं तसचं रामराव नावाच्या कॅरॅक्टला धरुन ईथं 'सहेतूक' हा शब्द येतो त्यांच वागणं, बोलणं, हसणं ईव्हन दुर्लक्ष करणही सहेतूकचं..
सहेतूक आला कि गुदगुल्या ठरलेल्याचं.. करंटेपणाची पदकही आनंदान मिरवता यायला हवितं असलं अद्भुत तत्वज्ञान आहे या पुस्तकात बाकी
फक्त नेमाडेंच्या मुठीत आपलं बोटं द्यावं एक सुंदर सफर आपोआपचं घडते..
(एक सामान्य रसिकं)
महेंद्र गौतमं.

जन्माला यावं अन् एकदा प्रेम करावं..,

मनाच्या रित्या कोप-यात
नाव तिचं कोरावं
कामाच्या धबडग्यातही
जरा तिच्यासाठी झुरावं..
जन्माला यावं...
अन् एकदा प्रेम करावं...
मग चंद्र जवळचा वाटतो
ता-यांची ओढ लागते..
प्राजक्त भुरळ घालतो..
कविता रुचतात, कधी कधी सुचतातं...
तमाम सिनेमांची गाणी
आपली आपली वाटतातं..
डोळ्या-डोळ्यांनी बोलणंही..
मोठं गोड असतं...
सकाळ संध्याकाळ मनाला
तिचंच वेड असतं..
वाढदिवशी बाराला तिचा
फोन असतो घ्यायचा
मित्रांच्या शिव्या खात
नंतर केक असतो कापायचा...
रोज संध्याकाळी ती
गॅलरीत येते...
अशी रोज रोज मग...
ईद मुबारक होते...
एखादा चोरटा स्पर्शही
हवाहवासा असतो..
स्वस्त मोबाईल प्लॅन
कुणी शोधत बसतो..
पाऊस आला म्हणजे आपणं
शेवरीचा कापूस होऊन जातो..
मनातल्या मनात तिच्यासोबतं..
कितिदातरी भिजून घेतो..
पण एखाद स्वप्नं
पुर्ण होण्याअगोदर जाग येते....
अख्खा दिवस त्या स्वप्नापायी
मन कसं हुरहुरुन जाते...
तरी मनाच्या कोप-यात
तिचं नावं कोरावं...
कामाच्या धबडग्यातही
कधी तिच्यासाठी झुरावं...
जन्माला यावं......
अन्
एकदा प्रेम करावं...
महेंद्र..

'अर्घ्यदानं'ला मिळालेली ही दिलखल्लास दादं...

महेंद्र कांबळे लिखित 'अर्घ्यदान' (कविता संग्रह)
अक्षरलेणं प्रकाशन, सोलापूर
मूल्य रू. ६०/-

व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. पण ढोबळ मानाने दोन प्रकारांत 'माणूस' ह्या प्राण्याचं वर्गीकरण करता येऊ शकेल. एक - सकारात्मक विचार करणारा आणि दुसरा - नकारात्मक विचार करणारा. कठीण, वाईट परिस्थितीत असताना, चिडून, निराश होऊनही सकारात्मक व्यक्ती त्या परिस्थितीतून काही तरी चांगलं शोधतेच आणि उभारी घेते व देतेच. कविता हेही माणसाच्याच मनाचं प्रतिबिंब. त्यामुळे हे ढोबळ वर्गीकरण कवितेचंही होऊ शकेल का ? केल्यास, महेंद्रची कविता ह्या सकारात्मक दृष्टीकोनाची कविता आहे, असं मी म्हणीन. त्याच्या 'अर्घ्यदान' ह्या कविता संग्रहातील कवितांतून तो आनंद, दु:ख, नैराश्य, संताप हे सारं काही मांडतो. गुलाबी प्रेम आणि धुमसणारा विद्रोहही दाखवतो. पण ही प्रत्येक छटा तो अगदी हलक्या हाताने रंगवतो. त्यात कुठेही आकांडतांडव दिसत नाही.

'अर्घ्यदान'ची सुरुवात होते, ती शीर्षक कवितेपासूनच. नैराश्याने ग्रासलेल्या भयाण अंधारात असतानाही कवी ह्या कवितेत असा विचार मांडतो आहे की ह्याही रात्रीची पहाट होणारच आहे. तो सूर्य नवीन असणार आहे आणि त्याचे स्वच्छ मनाने मला स्वागत केले पाहिजे. कालच्या दु:खामध्ये बुडून राहून मी उद्या येणाऱ्या अगणित क्षणांना येण्याआधीच कुजवणार नाही. इथेच आपल्याला जाणवते ती तिमिरातुनी तेजाकडे जाण्याचा आवेश दर्शवणारी शैली व हाताळणी. विद्रोहसुद्धा सकारात्मक असू शकतो. विद्रोहासाठी कविता काळोखी/ बरबटलेली/ कोरडी/ रापलेली व एकंदरीतच विद्रूप असावी लागत नाही.
स्फूर्तीदायी शब्दांत महेंद्र जेव्हा -

दीप घेऊन चाल गड्या
कर एकाचं तरी आयुष्य उजळ
जरी सूर्य नाही होता आलं
तरी निदान पणती होऊन जळ

असं म्हणतो तेव्हा आपल्याला, आपल्याच पाठीवर थाप देऊन एखादा मित्र प्रोत्साहित करतोय असं वाटतं. हाच मित्र जेव्हा अगदी त्याच्या मनातली गोष्ट सांगतो की -

वेदनेवर तिची फुंकर झेलताना
म्हणावं जिकीरीला 'शुक्रिया'
हॉटेलचं बिल ती देताना
म्हणावं फकीरीला 'शुक्रिया' !!

तेव्हा छानपैकी गुदगुल्या होऊन त्याच्यासोबत एक कटिंग चहाचा 'चिअर्स' केल्याचाही आनंद मिळतो !

ह्या छोट्याश्या पुस्तकात एकूण ४७ कविता आहेत. त्यातील मला जवळजवळ सगळ्याच अत्यंत आवडल्या. तरी, 'अर्घ्यदान, टोळधाड, प्रकाश गाणं, पाऊस गाणं, आयुष्य, रानपाखरांचा थवा, कातरवेळ, सई आठवण तुझी, शुक्रीया, फुफाटा, हुरहूर, मैत्रिणीस, ती, रंग' ह्या कविता मला फारच आवडल्या.
त्याच्या कवितांत सळसळतं तारुण्य जाणवतं. त्यात कुणाला उथळपणाही जाणवेल. पण, मला चैतन्य, खळखळाट जाणवला. तरुण वयातही सामाजिक भान असल्याचं अनेक जागी जाणवतंच.
प्रत्येक परिस्थितीकडे पाहाण्याचा दृष्टीकोन, आधी म्हटल्याप्रमाणे, बहुतकरून सकारात्मक असला तरी पु.लं.च्या विनोदासारखा हसवता हसवता हळूच एखादा खूण सोडणारा चिमटा घेण्याचा गुणधर्मही अनेक कवितांत आहे. 'फुफाटा' मध्ये एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा कॉलेजमधल्या मुला-मुलींना पाहून प्रेमाची स्वप्नं पाहायला लागतो आणि हलक्या फुलक्या शैलीत, ग्रामीण भाषेत, आपले विचार मांडताना कळतच नाही कविता कधी अत्यंत गंभीर वळण घेते आणि अखेरीस -

आठ एकर कोरडवाहू वायता वायता
जाईल माई बी जिनगानी सडून
शेतकऱ्याईच्या पोराईनं
काय करावं पिरमात पडून

- असं अंगावर येणारं भाष्य करते. अश्या अनेक कवितांतील अनेक ओळी म्हणूनच मनात घर करून राहातात. आपल्याला अपेक्षित नसताना एखादा चिमटा/ कोपरखळी/ चपराक बसते आणि मग तिथंपर्यंत लिहिलेल्या साध्या सुध्या शब्दांचेही संदर्भच बदलतात अन् डोळ्यात खुपतं एक बोचरं वास्तव.

माझं मन जणू मृग
चित्त धावं तिच्यामागं
काय धावून फायदा
तिचं रूप मृगजळ
मन झालं सैरभैर
कशी कातर ही वेळ ........................... (कातरवेळ)

सई आठवण तुझी
जणु वणवा गं रानी
पारव्याच्या ओठावर
आर्त विरहाची गाणी ........................... (सई आठवण तुझी)

विराण राज्याच्या मी कफल्लक राजा
फाटक्या फकीरीतही लुटायचो मजा ........................... (भूक)

अश्या अनेक ओळी सांगता येतील जिथे आपल्या तोंडून नकळतच 'व्वाह!' निघून जातं ! पण वैशिष्ट्य हे की हा परिणाम साधताना कवी कुठेही आक्रस्ताळेपणा करत नाही. तलत मेहमूदच्या गाण्यातील तरलतेने तो आपले दु:ख मांडतोआणि ते मांडत असताना आपल्याला दिसतो त्याचा - कवीचा - चेहरा.. मंद स्मित करणारा. त्या वेळी मनात एकच विचार येतो - This man is a smiling killer... very cruel !

बहुतेक कविता ह्या शेवटाकडे एक धक्का देणाऱ्या आहेत, वळण घेणाऱ्या आहेत. ह्या शेवटापूर्वी केलेली वातावरणनिर्मिती साध्या-सोप्या व संवादात्मक शैलीत आहे. त्यामुळे कवीला अपेक्षित पार्श्वभूमी लगेच तयार होते. कविता चित्ररुपाने दिसू लागते आणि मग शेवटी येणारा धक्का काही जागी काळजाचा ठाव घेतो, काही वेळी अंगावर काटा उभा करतो तर काही वेळी चेहऱ्यावर एक स्मित रेषा उमटवतो.प्रत्येक कविता एक संपूर्ण चक्र आहे. एक प्रवास पूर्ण करून आणि करवूनच कवी कविता संपवतो, तेव्हा खरोखरच कविता वाचल्याचं मनोमन समाधान मिळतं. जसं की -

माझ्यासाठी फुलांची पखरण करताना
निदान एक फूल तरी ठेवायचंस
स्वत:च्या केसांत माळण्यासाठी !! ........................... (मैत्रिणीस)

बळीराजा कृतकृत्य
होवो हिरवी ही धरा
भुकेजल्या पाखरांना
मिळो मोतियांचा चारा ........................... (पाऊस गाणं)

'अर्घ्यदान' ह्या पुस्तकात मुक्त छंद आणि काही अक्षरछंद असे दोनच काव्यप्रकार आहेत. कवी इथे जास्त प्रयोग करत नसला तरी विषय मात्र अनेकविध हाताळतो. खूप गूढ किंवा वजनदार तत्वज्ञान ही कविता सांगत नाही.... पण पुस्तक एकदा वाचायला घेतलं की लगेच खालीही ठेववत नाही. नक्कीच आपल्या संग्रही असावा असा हा एक छोटेखानी कवितासंग्रह आहे.

धन्यवाद महेंद्र ! आणि पुढील वाटचालीस मन:पूर्वक शुभेच्छा !

....रसप....

भाकरीच्या कविता..

चारी बाजुंनी अंधार हजारो हातं उगारत चाल करुन येतांना एखाद्या काजव्याचं क्षणीक लकाकणंही कुणालातरी प्रचंड धिर देऊन जातं. प्रकाशाची ती एक झलक झगडायची हिंम्मत दुपटीने वाढविते...

आपल्याकडे एक वर्ग असाही आहे ज्याच्यापुढे भाकर हा मुलभूत प्रश्न आहे. एकिकडे पानावर आणून हातावर खाणारा वर्ग तर दुसरीकडे सोन्याच्या ताटात चांदीच्या चमच्याने खाणारी माणसं.. ही तफावत सलणं सहाजिकचं.. अलोट दुःखात एखादाच सुखाचा आलेला क्षण उत्सव म्हणून साजरा करणारी सकारात्मक माणसं कशी झगडत असतील भाकरीसाठी?

जसं सुचेल तसं लिहायचा हा एक छोटासा प्रयत्नं..

"भाकरीच्या कविता.."

पोचल्यास दाद द्याचं पण त्याहीपेक्षा निर्मळ टिकेचं मनापासुन स्वागतं.

महेंद्र गौतम.

-----------------------------------------------------------------------------

1.

या येळलां...

मिरगं जोरदार पडल्यावर

किती मोहरलो..

बैलासंग बैलाईतकच राबलो..

सावकाराचे उपकारचं..

दिढीमाढीन का व्हयंना..

पेरणी तं साजरी केली..

आता हे डोलणारे

हिरवे हिरवे जवारीचे धांडे..

कसं हिरवंगार वाटतयं...

अडत्यांना जरा बुध्दी येऊ दे..

या साली जरा भाव मिळू दे..

कणगीत दाणे असेच खेळू दे..
महेंद्र गौतम
-----------------------------------------------------------------------------------

2.

या येळला...

इंटरव्हू तं जोरदार गेला..

सगळ्याच प्रश्नाची उत्तर ठाऊकं..

लोकायसारखा सिगरेटचा नादं..

आपल्याला कव्हा परवडला?

पण रातीतून तंबाखुचे बार लावतं

केलेला अभ्यास आता कामी आला..

डि.एड. करुन बी विनाअनूदानीतवर कामं...

त्यापेक्षा गावची ढोरं बरी वाटायची

अन् आपल्याजवळ कुठले पंधरा लाखं...

ज्याच्याजवळ होते ते चिकटले कायमचे...

सोय-यायसाठी अन् कमाईसाठीच तर

ईथ संस्था निघतातं...

आपण मात्र घडवायचे विद्यार्थी...

एकदा अनूदानीतवर लागू दे.

भरल्या पोटानं आनंदान जगू दे..
महेंद्र गौतम

हट्ट

अरे ईकडे ये
अंकलला ट्विंकल ट्विंकल म्हणून दाखवं....
अगं ते गाणं म्हणं बरं...
हिला सारेगमात पाठवायचयं जिंकेल ना?
बघा किती छान नाचतो ना...
टिव्हीवर दिसायला पाहिजे...
आम्हीतर एव्हढे पैसे भरुन
त्याला क्रिकेट अकादमीत घातलं..
सर म्हणाले गट्स आहेत
20-20 नक्किच खेळेलं..
हि बघ तुझी नविन रॅकेट..
तुला सायना व्हायचं ना...?
याच तर सारखं कम्प्युटर कम्प्युटरं..
ईतकं कळत ना आताचं त्याला..
कम्प्युटरचा जिनिअस होईलं नक्की..
अरे मातिचं भांड कसं फुटल तुझ्यानं.?
आता लहान आहेस का? सव्वापाच वर्षाचा झालास ना..!!!
तुला कळत नाही का?
मातित हात घालू नये जर्म्स असतातं..
चल हँडवाँश घे...
पाण्याच्या डबक्यात पाय घालू नये..
असं पाणि उडवतं चालू नये...
कुत्र्याची शेपुट ओढू नकोसं..
प्लँस्टिकचा असला तरी...
किती रे चाँकलेट मागतोस...
फर्स्ट स्टँडर्डला गेलास ना...
आता लहान मुलासारखा हट्ट नाही करायचा...
महेंद्र गौतम..


ललीत...

एकदा गावच्या डोंगरावर भटकतांना मला एका भल्यामोठ्या दगडावर एक झाडं उगवलेलं दिसलं, जवळ जाऊन बघतो तर गंमतच होती. अगदी जराशीच माती त्या दगडावर, कुठूनतरी येऊन ते बिजं त्यात रुजल असावं. मी विचार केला या झाडाचं आयुष्य किती?
पण एकाएकी तरारुन आलेल्या त्या हस-या झाडाचं हिरवेपण बघून अगदीच रोमांचीत झालो. कदाचीत ते झाड म्हणत असावं दगडाशी झुंजून थकेस्तोवर तरी भरभरायचं नंतर भलेही सुकून जाऊ..
रुजण्यापूरती माती आहे, हवा आणि ओल आहे मग कशाची वाट बघायची? चला रुजुयातं...
खरतरं पानगळ कष्टप्रदच. अश्या पानगळीच्या काळात सोबतीची पाखरंही उडून जातात, ज्याची त्यानेच सोसायची असते भयाण पानगळं.
एखादा सामान्य माणूस किंवा नावाजलेल व्यक्तिमत्व प्रत्येकालाच पानगळीतून जावं लागतंच. पण तश्या विदीर्णावस्थेत स्वतःला टिकवुन ठेवणं उद्याच्या बहराची वाट पाहत त्या असह्य झळा सोसत जाणं. जिकीरीचच कामं. पण तश्या एकाकीपणात कुठूनतरी चार दवाचे थेंब मिळतात अन् नवपालवीच स्वप्न अजून गर्द होत जातं..
पूर्वी ढ कॅटॅगिरीत मोडल्या गेलेला आणि आता मात्र स्वतःच्या गावची अख्खी बाजारपेठ काबिज करणारा माझा एक चिक्कार यशस्वी मित्र..
मध्यंतरी त्याला भेटायचा योग आला त्याचे शब्द अजून रुंजी घालतात. "आयला काहिच नव्हत रे हातात हिंमतीशीवायं...!!
आज तो ऐन बहरात आहे पण त्यानेही पानगळ सोसलीच ना?
शेवटी ज्याच्यात कळा आणि झळा सोसायची धम्मकं आहे त्याच हिरवेपण कुणीच हिरावू शकतं नाही.. नाही का?
महेंद्र कांबळे.

तिच्या अस्वस्थ उशाशी..

तिच्या अस्वस्थ उशाशी..
एक अपराधी चंद्र
काही मोडकी नक्षत्रं
चारदोन ओले श्वासं...
अर्धवट सांजवेळा
काही जिवघेण्या कातरवेळा....
आईचे रापलेले हातं
बुडाशी डागलेला भातं...
कशी जुळवून घेत असेलं..?
डोळ्यातल पाणी लपवतं
नव-याशी कसं हसत असेल?
घुसमटतही असेलं...
धुसफूसतही असेलं...
त्याच्या नावाचं कुंकू लावतांना...
जरा बिचकतही असेलं..
काय केलं असेल बिचारीनं..
त्या असंख्य गज-यांच?
दरवर्षी न चुकता मिळालेल्या
टपोर गुलाबांच....?
निर्माल्यं..!!! अजून काय?
तिच्या अस्वस्थ उशाशी...
एक किर्र मध्यरात्रं...
अन् अंधारात हरवलेल एक स्वप्नं...
तृप्तातृप्ततेच्या मध्यावरं..
त्याच्या शेजारी पहूडलेलं
तिचं अचेतन शरीरं...
महेंद्र कांबळे.

मरण सोहळा

कुणी स्वतःच स्वतःचं मरण निवडत असेल का?
निट विचार करुन आता बस, जे मिळवायचं ते मिळवलं जगण्याचा हेतू पुर्ण झाला, आता आपण समाधानान मरायला हवं असं कुणाला वाटू शकतं का?
मला वाटतं वाटत असावं, पण सामान्य लोकांच्या आकलन कक्षेच्या पलीकडल्या लोकांना.. ज्यांना जगण्या-मरण्याच्याही पलिकडे बघण्याची नजर मिळालीय..
विचार करा काय सुखावह भावना असेल त्यांची एकदम तृप्त तृप्त मरणं.... एखाद्या संतानं समाधी घेणे किंवा एखाद्या नावाजलेल्या कलाकाराने आत्महत्या करणे....!!!
महेंद्र कांबळे.

सजा....

(खरतर मातृभाषे व्यतिरिक्त आपल्याला
दुस-या कुठल्या भाषेत काही सुचेल असं स्वप्नात देखील मला वाटल नव्हतं. पण सुचल त्याला नाईलाज आहे, असंख्य चुकांसहित मी हिंदीत पहिल्यांदाच लिहिलेल काहितरी त्यावर कुणाचा प्रभाव आहे कि काय माहित नाही.)
सजा....
समेट के रखे है दामन मे
कुछ एहसानपरस्त पल
कुछ सपनोसे भरे कल
कुछ तेरी मनचली बाते
कुछ चुराई हुई मुलाकाते
सबसे छुपाकर रख लिये थे मैने झोली मे
चाँद के चंद टुकडे...
संभालकर रखा है तेरी हर रुसवाई को...
और मेरा हर जर्रा रोशन करनेवाली
तेरी हर तिलमिलाती याद को...
तु आई खुशिया लेकर
जैसे रेगीस्तान मे भटके मुसाफिर को...
बरसात की चार बुँदे मिली हो...
बडी रुखीसुखी फिकी बेजानसी थी जिंदगी....
अब तेरा दर्द मुझे रोज जिंदा होने
का एहसास दिलाता है....
या खुदा, सच बोलने की
किसीको ऐसीभी सजा मिले....
की रोज कतरा कतरा....
वो मरता चले.....
(माही)
महेंद्र कांबळे..

चारोळी

बहरायची स्वप्न...
मी पानगळीत बघतो..
विदीर्णावस्थेत असा
भरभरुन जगतो...
महेंद्र कांबळे
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected