लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गाऊ चांदण्याच गाण...

अवघड जरी घाट
अवघड उतरण
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

तप्त दग्ध अशी धरा
देऊ श्रावणाच्या धारा
ठेऊ हसरा चेहरा
नको सजल नयन
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

माझ्या मनाच कोंदण
तुझ्या प्रितीच चांदण
तुझ्या प्रेमाचा सहारा
आणि सुख पखरण
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण

दुखप्रद जरी जीण
उभ आयुष्य दोलन
तुझी साथ असे मला
वाळवंटी मरुद्यान
वेचू आनंदाचे कण
गाऊ चांदण्याच गाण…
महेंद्र गौतम.

निनादते घंटा

निनादते घंटा
रोज तुझ्या दारी
भार असा शिरी
टाकीला का?
चढविले रोज
पायी तुझ्या फूल
तूच अशी हूल
का रे दिली?
ऊर जड माझा
श्वास जड माझे
पाठिवर ओझे
वाहू कैसे?
नाद ताल गेला
सांगू कसे तुला
सुर हरवला
जिवनाचा
दुभंगली भुई
कोणी वाली नाही
डोळा पाणी वाही
सारखेच
रोजच पडते
दुखाःत या भर
अंत आता कर
वेदनेचा.
महेंद्र गौतम.

'जगायचं' कधी मगं...?

आयुष्य म्हणजे काय बुध्दिबळाचा पट असतो का राव?
प्रत्येक पाऊल तोलून मापून टाकणं, समोरच्याचा अंदाज घेतं पुढचं प्लॅनींग करणं.. मान्य आहे बाबा चौकसपणा हवा, जगण्यात शिस्त हवी. काहितरी मिळवण्यासाठी या गोष्टी आवश्यकच.
पण एखादा सहज जरी वागला काही बोलून गेला तरी रात्रभर दिवसभर हा असाच का बरं वागला असेल असा विचार करत बसायचं? डोक्याची वाट लावून घ्यायची?
अन् म्हणे अचीव्हर्स असेच वागतातं...
चोवीस तास असच रहायचं....
मायला 'जगायचं' कधी मगं...?

पावसाकड पाहुन.....

मस्त रिमझीम सुरू होती. थंडगार रोमँटिक हवा, अश्यावेळी चहा भज्यांचा माहोल तो बनता ही है.. आम्ही कँटिनमध्ये घुसलो.
'अज्जु तिनं भजे.... गरम'
तो खिन्नशी मान हलवत पाय ओढतं कढाईकडे हातात तिन प्लेट घेऊन निघाला. मी मनात म्हटलं काहितरी बिनसलय याच आज नेहमीसारखा प्रसन्न नाही दिसतं.. भजे संपता संपता मी परत ओरडलो 'अज्जु तिन काँफी तुझ्याहातची स्पेशलं' त्याचा चेहरा मलुलचं..
एवढ्यात काऊंटरवाला मामा त्याच्याजवळ गेला.
अज्जु एव्हढी काँफी बनव आणि तू दोन एक घंट्यासाठी घरी जाऊन आराम करं. कोप-यात छत्री आहे भिजत नको जाऊ. त्याचा चेहरा फुलला पटकन वाफाळती काँफि माझ्यासमोर ठेवली तेव्हा डोळ्यात भारी चमक होती त्याच्या. तो आनंदाने उड्या मारत निघून गेला. कौंटरवाला मामा हळूच माझ्या जवळ येत म्हणाला 'कसय नवनवच लगन झालै त्याचं, पावसाकड पाहुन उगीच चुकचुक करित व्हता म्हणून दिलं पाठवुनं.. एक डोळा मारत मामा पुढ म्हणाला..
'आरं आम्हिय कव्हातरी नवेतरणे व्हतोच की'.
आम्हि तिघं हसलो..
आजची काँफी मात्र नेहमीपेक्षा जरा जास्तच कडक होती..

आपण सगळे गांडूळ गांडूळ...


हा माझा भारत आहे. धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व, सहिष्णुता यांचा पुळका आणनारा.
२०२० मध्ये महासत्ता होण्याचा आव आणनारा……….
इथे शोषणाविरुद्ध विधायक मार्गाने लढणार्याला डोक्यात गोळ्या खाव्या लागतात…
आणि अनुष्ठानाच्या नावाखाली कोवळ्या मुलींचं शोषण करणार्या छी** बाबासाठी जेलभरो होत, त्याची निर्लज्ज पाठराखण केली जाते.
भारत म्हणजे मी
भारत म्हणजे तू
भारत म्हणजे 'आपण'……….

-----------------------------------------------------------------------------------------------------------
मी एक गांडूळ तू एक गांडूळ
तो एक गांडूळ ती एक गांडूळ
आपण सगळे गांडूळ गांडूळ

मड पडेतो खाणारे गांडूळ
घाणीतच राहणारे गांडूळ
मरता मरता या दुनियेला
पौष्टिक खत देणारे गांडूळ
आपण सगळे गांडूळ गांडूळ

बाबा, बुवा, मा,अम्मां, बापु.
सा-यांना भजणारे गांडूळ
खादी खाकी करी कुरघोडी
सुखे घरी निजणारे गांडूळ.
आपण सगळे गांडूळ गांडूळ
--------------------------------------------------

गांडूळाना नसतो धर्म
गांडूळाना नसते जात
कोणी यावे चिरडून जावे
गांडूळाना नसती दात

वादळानो एक व्हा रे
बारुदानो पेट घ्या रे
गांडुळानो नाग व्हा रे
गांडुळानो नाग व्हा रे….
(गांडूळांचे पुन्हा नाग होऊ दे या आगामी दणक्यांच्या संग्रहातून )
महेंद्र गौतम….
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected