लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

परत एकदा.

अजुन का स्मरतो मजला
तो तूझा उन उन श्वास
अजुन का दारास दुपारी
सतत चांदण्यांचे आभास.

अजुन पुरता मेलो नाही
थोडा बहूत जीवंत आहे
अजुन मनाच्या कोपर्यात त्या
थोडा थोडा वसंत आहे.

वठलेले जरी झाड जाहलो
परत नव्याने होईन हिरवा
उरातली विसरून भैरवी
परत आता छेडीन मारवा.

परत एकदा लिहिन कविता
डोळ्यामधले पुसून पाणि
हरफ हरफ जुळवीन नव्याने
तुझ्यावरतीच लिहिन गाणी......

महेंद्र गौतम.

कविता असते.

कविता असते द्रोह...
कविता जाळ असते....
कविता कधी कधी.....
फुलांची माळ असते....

महेंद्र गौतम.

एका हळव्या क्षणी म्हणाली..

���एका हळव्या क्षणी म्हणाली
डोळ्यामध्ये आणून पाणि
इथवर होती साथ आपूली
सरली राजा इथे कहाणी

तुझ्यासवे रे मला  मिळाले
जगणे जैसे युगायुगाचे
फुलपाखराच्या पंखाना
स्वप्न दिले रे तूच नभाचे

तुझ्यासंगचे धुंद धुंद क्षण
दाटून येतील कधीही पटकन
घरभर होतील काचा काचा
अन डोळा पाणी रे टचकन

गळाभेट अन अंगुल गुम्फन
डोळ्यामध्ये हरवून जाणे
उगीच म्हणने नको नको ते
सारे असती लुळे बहाणे

वेडा रा�जा आता जगतो
स्वप्नाच्या उध्वस्त महाली
ओल्या अगतिक कविता आणि
शब्दांच्या वाहतो पखाली

वेडा राजा वेडी राणी
त्यांची ही वेडीच कहाणी
येता जाता वारा गातों
का त्यांच्या विरहाची गाणी?

एका हळव्या क्षणी म्हणाली
डोळ्यामध्ये आणून पाणी
इथवर होती साथ आपुली
सरली रजा इथे कहाणी.......

महेंद्र गौतम.

वंचनेची वंचना......

तुझ्या मंदिराची मला पायरी कर.
कधी गाभा-याची अपेक्षा मी केली......
सर्वस्व वाहून तुझ्या चरणावरती
नेहमी तू माझी उपेक्षाच केली....

अलवार वाजे कुठे दूर मुरली
व्याकुळ झाली तिची ती न उरली.....
जरा काळजी ना तिच्या सावळयाला
नशिबी मिरेच्या विषाचाच प्याला......
महेन्द्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected