लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

पाखरं गाणी गाणार आहेत.

पाखरं गाणी गाणार आहेत

या आकृतीबंधातुन त्या आकृतिबंधात
डुबूक उड्या मारतांना
डोळ्याआड होऊ देऊ नकोस
प्रकाश पेरण्याच्या गोष्टी.
कारण ढुंगणाला लाईट लाऊन मिरवणारा
चमको कविकाजवा होण्यापेक्षा
मुकाट मेंगळमिचकं जगणही नसत वाईट.
सडक्या कुजाळ मेंदून
युगायुगा पासून वावरणा-यांना
वाईट वाटणही सहाजीकच
पण चोंभाळा चोंभाळी अन
सांभाळा सांभाळीन वाया जाशील का?
उन्हान रापलेल्या काळ्याठिक्कर
उघड्या पाठीवर जेंव्हा सांडेल
दुधाळ पुलकित चांदण तेंव्हा बहरशील
पण पर्वताचा उरभेद करणाऱ्या
पहारधारी घट्टेदार हातांनी
जेंव्हा विज खेळवता येईल तेंव्हाच
मांड ठोकुन लिहायला बस..
आणि जेंव्हा हातात पहार घेऊन
कमरेला बिज बांधत
एकटाच उतरला होतास
या पडीक रखरख जमिनीवर
तेंव्हाच मला कळल होत
की ढग भरून येणार आहेत
अन पाखरं गाणी गाणार आहेत.

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected