लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

अनावर

अनावर.

तू नाभिचा चंद्रमा.

नित मला बेहोश करतो
गाली तुझ्या जो रक्तिमा
काय बोलू साजणे मी
तू नभिचा चंद्रमा

या लटांची वादळे
सोसु कशी मी सांगना
हळुवार करशी घाव तू
अलवार देशी वेदना

डोळे जणू सम्मोहिनी
ओठात तव भरली नशा
दे हात हाती एकदा
बघ धुन्दल्या माझ्या दिशा....

महेंद्र गौतम.

ललीत.

काही महिन्यां अगोदर  निर्माते बाबुराव भोर यांचा अचानकच फोन  आला,  "एका चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहायचेत जमत असेल तर पुण्याला ये."
रात्री बऱ्याच उशीरा पुण्यात पोचलो डेक्कनच्या हॉटेल डेक्कन रॉयलला उतरण्याची सोय होती. भोर सर त्या प्रोजेक्टचे EP होते, मुख्य निर्मात्यांचीच कथा होती. मला एका portion साठी संवाद लिहायचे होते आणि डीरेक्टरसोबत बसून  स्क्रीनप्ले लॉक करायचा होता.  दुसऱ्या दिवशी टिम समोर कथावाचन सुरु होत, मी हातात कागद पेन घेऊन
काही महत्वाचे मुद्दे टीपुन घेत होतो आणि दरवाज्यातून हातात पुस्तक घेऊन एक गृहस्थ आत आले, कथा ऐन रंगात होती म्हणून कुणाशीच न बोलता ते माझ्यासमोरच बसत छान हसले. कथावाचन संपल. चर्चा सुरु होण्याअगोदर निर्मात्यांनी ओळख करून दिली. माझ लक्ष्य समोर ठेवलेल्या पुस्तकावर गेल पुस्तक होत "झुलवा" आणि माझ्या समोर बसून माझ्याशी हसलेले गृहस्थ होते "झुलवाकार उत्तम बंडू तुपे" म्हणजे "अप्पा".   
पुढचे चार पाच दिवस अप्पांचा सहवास लाभला, एक दिवस दुपारी लंच घेतांना अप्पांनी विचारल काही लिहिलस का? पुस्तक वगैरे प्रकाशित केलस का? मी बोलण्या अगोदर भोर सरच म्हणाले सुंदर लिहितो हा, दिवाळीत आम्ही शूट केलेला सिनेमा ह्यानेच लिहिलाय. कथा,पटकथा, संवाद,गाणी याचीच होती शिवाय एक पुस्तक पण प्रकाशित आहे आणि दूसर लवकरच येतय. अप्पा समाधानाने हसले बोलले छान आहे मला वाचायला दे काही असेल तर, क्षणभर मी बधिरच झालो म्हटल, भस्म, झुलवा यासारखी अप्रतिम पुस्तक लिहिणारा हा माणूस. वय वर्ष फक्त 80. जो सयाजी शिंदेला फोनवर सया म्हणतो,अशोक समर्थ त्याच्या सुरवातीच्या काळात ज्यांच्याकडे राहिलाय. तो माणूस माझ्यासारख्या नुकतंच लिहू लागलेल्या पोरसवदा लेखकाला म्हणतो तुझ लिखाण दे वाचायला, अनायासे जवळ "अनावरच" प्रकाशकान पाठवलेल पहिल प्रूफ होत तेच दिल त्यांना.
संध्याकाळी सगळ वाचून  ते माझ्या जवळ आले पाठीवर हात ठेवत बोलले, खरच सुदंर लिहितोस, दम आहे गड्या लिखाणात तुझ्या आणि मी हे बोलायच म्हणून बोलत नाही. मी आठ वर्ष शासनाच्या राज्यस्तरीय पुरस्कार समितीत काम केलय हा संग्रह माझ्या हातात असता तर तुलाच दिला असता पुरस्कार. लिहित रहा, कथा लिही कादंबरी लिही, फकत कवितेवरच नकोस थांबू.काय वाट्टेल ते लिही. आता झुलवावर सिनेमा करायच चाललय तुला नक्की बोलवीण तेंव्हा. त्यांच्या बोलण्यान लैच आनंद झाला. म्हटल अप्पा येणाऱ्या पुस्तकाला आशीर्वाद दया त्यांनी लगेच अनावरसाठी पाठराखण दिली आणि लिहित राहण्यासाठी नविन बळ देखील.

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected