लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

कथा विस्तव विळखा.

एक शब्द.... :- विस्तव विळखा
एक वाक्य.... :- वाळविन पोखरलेल एक हिरवगार झाड.

कथासार....
माणूस निसर्गाची अद्वितीय कलाकृति. त्याने तंत्रज्ञान आणल आणि जगण अधिक सूखकर तसच सुसह्य झालं.
पण जस तंत्रज्ञानान त्याला समृद्ध बनवल तसच व्यसनाधीन आणि पांगळ देखील. त्याची वृत्ती सुखलोलुप झाली.
पण प्रत्येक तंत्रज्ञान हे शरीरकेंद्रिच असत मनासाठी आत्म्यासाठी आहे कुठली टेक्नोलॉजी ?
                                         मोबाईलने दुरच माणूस जस जवळ केल तसच जवळच माणूस दुरदेखिल. रोज कट्ट्यावर जमणारी दोस्तमंडळी आता  whatsapp आणि fb ग्रुप वर जमू लागली दोघातिघातला एक कटिंग चहा अन एक मिसळ गेली,
पाठीवर पडणाऱ्या थापेची संवेदना हरवली, उरल्या फक्त डोळ्यांना टोचणाऱ्या पाणचट स्मायलीज.
सदा, सिमा आणि दोन लेकरांचा एक हसता खेळता संसार आणि त्याच्याच समांतर  रवी-रूपाचं फुलणार प्रेम. पण एका एंड्रॉइड फोनमुळे लागतो  त्यांच्या निर्व्याज नात्याला सुरुंग त्याचीच ही कहाणी.....
                                   ------------------- शीर्षक-------------
                                                 
                                                      एंड्रॉइड फोन
तंत्रज्ञानाच्या नको तेव्हढया आहारी गेल्यान होणाऱ्या भयंकर दुष्परिणामाची ओघवत्या शब्दातील  "महेंद्र गौतम" यांची एक
कालसुसंगत कथा. 
लवकरच तुमच्यासाठी...

गजल आई

गझल

पैका पैका गाठीशी का बांधत होती आई
फाटकाच संसार नव्याने सांधत होती आई

पायामधल्या कुरपाची ना कधी काळजी केली
सावलीत तू उन्हामध्ये अन नांदत होती आई

कसा सारखा धावत असतो पैश्यामागे वेड्या
तुझ्याचसाठी गुडघ्यावरती रांगत होती आई

तुझ्या बायकोच्या दिमतीला गॅस मिक्सर ओव्हन
तिखट धूरात आनंदाने रांधत होती आई

हमसून हमसून का रडशी जेंव्हा नसते आई
जप स्वतःला जातांनाही सांगत होती आई.

महेंद्र गौतम.

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected