लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

गोष्ट मंतरलेल्या दिवसांची.

गोष्ट मंतरलेल्या दिवसांची......
1. अप्पा..
होस्टेलच्या सगळ्यात कोप-याच्या खोलीत अप्पा नावाच्या अफलातून रसायनांचा निवास होता. पॉलीच्या तिन्ही वर्षात  त्याने कोपरा कधी सोडला नाही. दरवाजातून कोणाला बोलवायच असल्यास फोकनीच्या नाऱ्या अस जोरात बोंबलणार. ''फोकनीच्या'' त्याची पेटंट राष्ट्रिय  शिवी, कुणाच्याही नावाअगोदर फोकनीच्या हे प्रीफिक्स लावण हा अप्पाचा मुलभूत राष्ट्रीय हक्क होता फोकनीचा मास्तर, फोकनीचा मामा,फोकनीच पेन, अप्पाच सगळच फोकनीच आणि पोरांना त्यांच्या फक्त बापच्याच नावानं हाक मारने या नि-याने सुरु केलेल्या परंपरेचा अप्पा निष्ठावान राष्ट्रिय पाईक होता.त्याला "सनमान" खानची बावडी आवडायची तरी त्याचा आवडता राष्ट्रीय हिरो होता "सनील देवल". भाबडेपणान एखाद्याची वाट लावण हे अप्पाच राष्ट्रीय वैशिष्ट. आमच्या विंगमध्ये एक शास्त्रीय (राष्ट्रीय नव्हे) गायक होता तो विंगमधून गुणगुणत जात असतांना त्याच्या गाण्याची वाट लावणे हा अप्पाचा खास राष्ट्रीय छंद होता. एकदा तो मंजुळ स्वरात  गात चालला होता  ''वाटेतले काटे वेचीत चाललो...'' अप्पा जोरात ओरडला  ''लोकांच्या ढुंगणाला टोचीत चाललो....''
("गोष्ट मंतरलेल्या दिवसांची"मधून)
महेंद्र गौतम.

जिव जायचा थांबला....

कशी तुटली दारात
सांग मोतियांची माळ
तिथे अबोल नजरा
ईथे पेटलेला जाळ

किती सांज चिनभिनं
गेल्या उसासुन राती
ओल्या जखमाच साऱ्या
पुन्हा रक्ताळून येती

नेल्या पुसून लाटांनी
ओल्या पावलांच्या खुणा
असे भरती ओहोटी
समजावे कसे कुणा?

तेंव्हा बोलली तू होती
चल घर एक बांधू
आता फाटलेल जीणं
सांग कुठं कुठं सांधू?

पोतराजाचा चाबूक
सारा खुशीचा मामला
डोकावून नको बघू
जिव जायचा थांबला...

महेंद्र गौतम

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected