लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

Novel

जंगल अजून शाबूत आहे, हे ऊंचच ऊंच इमारतींचं शहर दिसत असलं तरीही ईथे कायम नांदत असतं एक सनातन जंगल. सशाचं काळीज घेऊन जन्माला आलास हे मात्र तुझं चुकलंच. आता या कॉर्पोरेटमध्ये टिकायचं असेल तर शक्य तेव्हढा क्रूर हो, थोडक्यात सिंह हो जो हरणाची शिकार करून खातो. नाहीतर उपाशी मर..... तो बोलला. ऐकुन घेऊन मीही एक दीर्घ श्वास घेतला वाफाळ कॉफीचा दिर्घ घोट घेत बोललो.
"मित्रा या उंच इमारतींच्या, चकाचक मॉलच्या, क्रेडिट कार्ड्स, सॅलरी हाईक, अलोकेशन्स, mom, DPR, इन्क्रिमेंट्सच्या पलीकडं पण एक नांदतं जग आहे, जिथे निंबाच्या झाडाखाली दुपारच्या निवांतवेळी बायका पापड, कुरोड्या करता करता स्वतःची दुखणी खुपणी शेअर करतात. पारावर म्हाताऱ्यांचा जमावडा बसतो. संध्याकाळी थकून भागून आलेले लोकं, शाळेतून आलेली मुलं याने घर गजबजतं, आणि तेंव्हा कमी दुधाचा काळपट चहाही अमृतगोडीनं जो तो पिऊन "फ्रेश" होतो. लोडशेडिंगच्या अंधारात माणसं भजनात दंगतात. आणि पाव दिडपावं मटणात पाच सहा जणांच कुटुंब पोट भरून जेवतं त्यातही आठवणीनं वाटीभर रस्सा आणि दोन खांड शेजारच्या मावशी मामी काकी च्या घरी पोहचवल्या जातो...
मी थांबलो त्याने केविलवाण्या नजरेनं माझ्याकडं बघितलं आणि हातातल्या सिगारेटची ash अंगठ्याच्या टिचकीने झटकली...

(लिहिण्यातून)

महेंद्र गौतम
All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected