लेखक महेंद्र गौतम | मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

मराठी साहित्य | मराठी संस्कृती | मराठी वाङमय | गर्जा महाराष्ट्र माझा |

सुविचार

"यशामुळे आपली ओळख लोकांना होते आणि अपयशामुळे लोकांची ओळख आपल्याला होते..!"

हा ब्लॉग शोधा

जिंदगी तुझको धुंडती है अभी..

ऑफिसवरून परततांना लक्षात आलं की सकाळसाठी ब्रेड नाहीयेत,
नेहमीच्या बेकरीवाल्याकडं निघालो,
दुकानासमोर पोचतो तर मागून एक हाक आली, चांगल्या कापड्यातला
पायात नीट स्लीपर असणारा एक माणूस होता.
"Excuse me gentle man, sorry to disturb you. Can you please give me 10 rupees".तोंडाला भपकारा होता त्याच्या, आजवर पुण्यामुंबईतच काय पण औरंगाबादला पण असे नमुने कैक पहिले,
काय एक एक शकली लढवतात अन गंडवतात, पण हा भौ त डायरेक्ट विंग्रजिच हाणू रायला,
मी जरा खिसे चाचपल्या सारखं केलं अन म्हटलं,
"Oh so sorry sir, actually I don't have change right now."
तो हसला म्हणाला,
"No issue no issue, actually don't misunderstand I am a Marine engineer
Not a begger You know my wife is admitted in hospital
So I am nervous."
तो निघून गेला, मी बेकरीत घुसलो. बेकरीवाला बोलला,
" काय म्हणत होता तो वेडा?"
तो वेडाय? मला तर बेवडा वाटला राव.
बेकरीवाला हसला, त्याने सांगितलं असेल तुम्हाला की त्याची बायको
एडमीट आहे, मी हो म्हणालो.
तो असाच सांगतो सगळ्यांना दहा रुपये मागतो अन जाऊन 
दारू पितो. खरतर 10 वर्षांअगोदरच बिचाऱ्याची बायको वारलीय.
तो तिथेच अटकून आहे अजून. खलाशी होता, मुलगा चांगलाय त्याचा
सूनसुद्धा चांगली मिळाली त्याची काळजी घेतात.
त्रास मात्र कोणालाच देत नाही तो.
डोकच चाललं नाही राव जरावेळ.
ब्रेड दूध घेऊन परततांना तो दिसला,
मी जवळ जाऊन एक पन्नाशी त्याच्या हातावर टेकवली
"Oh thank you gentleman god bless you my son "
तो तंद्रीतच होता,
खूप वेळ अस्वस्थ वाटत राहील,जिच्यावर जीवापाड प्रेम केलं
ती सोबतीनं अशी अचानक अर्ध्यात सोडून गेल्यावर
काय भोगलं असेल बिचाऱ्यान आणि काय व्यथा घेऊन जगत असेल
याची कल्पना करूनच गहिवरून आलं.
ओठावर ओळी आल्या...
"शहर की बेचिराख गलीओ में
जिंदगी तुझको धुंडती है अभी...

महेंद्र गौतम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

All Rights Are Reserved @ Mahendra Kamble. Blogger द्वारे प्रायोजित.
myfreecopyright.com registered & protected